Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किसान सेलच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी व्यंकट झाडे यांची नियुक्ती

 
प्रतिनिधी : शहाजी नन्नवरे

तुळजापूर: तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालय मध्ये धाराशिव जिल्ह्याचे जेष्ठ नेते जीवनराव गोरे व किसान सेलचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या शुभहस्ते किसान सेलच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी व्यंकट भगवान झाडे यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील,ज्येष्ठ सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील,युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहेद शेख,ज्येष्ठ नेते शहाजी नन्नवरे,युवक तालुका उपाध्यक्ष समाधान देवगुंडे,माजी सभापती दिगंबर खराडे,माजी सरपंच दिनकर पवार,अनिल कदम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या