Ticker

6/recent/ticker-posts

हजरत टिपू सुल्तान यांच्या जयंतीनिमित्त ५० बहाददरांचे रक्तदान


प्रतिनिधी : अहमद आन्सारी

मंगरुळ : तुळजापूर तालुक्यातील मौजे. मंगरुळ येथे महान स्वातंत्र्य सेनानी,ब्रिटिशांविरोधात पहिला आवाज उठवनारे हजरत टिपू सुल्तान यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे ५० बहाददरांनी रक्तदान केले. 

हजरत टिपू सुल्तान यांच्या जयंतीनिमित्त (दि.२०) रोजी टी एस ग्रुप मंगरुळच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन हजरत टिपू सुल्तान यांच्या प्रतिमेचे पूजन व फित कापून जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे,महेश डोंगरे,उपसरपंच गिरीश डोंगरे,ग्रामपंचायत सदस्य गोविंद डोंगरे,आप्पासाहेब जेटीठोर,राजकुमार पारधे,मकरंद डोंगरे,विपीन खोपडे,बाळासाहेब लबडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार चांदसाहेब शेख यांनी केले.

या कार्यक्रमासाठी आदमशा फकीर,सोहेल बागवान,सोहेल शेख,जुबेर मुलानी,अरबाज शेख,सुजाईद पठाण,सोनू शेख,सरताज तांबोळी,बबलू शेख, जमीर शेख व हजरत टिपू सुल्तान जयंती उत्सव समितीच्या व टी एस ग्रुपच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या