प्रतिनिधी : राम थोरात
तुळजापूर : तुळजापूर येथील बोरी नदीजवळील मोर्डा रोडवरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, संबंधित पुलाची इस्टेमेंट, वर्क ऑर्डर प्रमाणे पंचनामा व चौकशी करुन, संबंधित गुत्तेदार, अधिकारी यांच्यावर शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून अपहार झालेली रक्कम वसुल करुन, शासनाच्या खात्यावर जमा करुन, तसेच निकृष्ट दर्जाचा झालेला पुल पाडून नवीन पुल तयार करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन चालू ठेवण्याचा ईशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने निवेदनाव्दारे देण्यात आला.
अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, तुळजापूर यांना दि. २१ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोरी नदीवरील मोर्डा रोडवरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, सदर कामाचा पंचनामा व चौकशी करुन संबंधितावर गुन्हे दाखल करुन, शासनाची फसवणुक झालेल्या रक्कमेचा अपहार वसुल करणे. सदरील पुल लहान असल्याने, पावसाळयात पुरसदृश्य परस्थिती होत असून, सदरील पुल हा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरलेले असून, सदरील पुल पाडून उंची वाढवून पुल नवीन करावे, अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे वतीने रास्ता रोको आंदोलन चालू राहिल असा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला. निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष नेताजी शिंदे, शहराध्यक्ष निखील अमृतराव, शिवाजी अंबरे, धैर्यशिल कापसे, पंडीत जळकोटे, बालाजी जाधव, अबुसलाम काझी, ईसाक शेख, पि.के. चव्हाण, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत गायकवाड, सैफन शेख, भागवत भरगंडे, दत्तु वाघमारे, आबासाहेब भोजने, शिवराज जगदाळे, चंद्रकांत ढगे, सागर गोसावी, शिवहार साबळे, सिद्राम गोरे, मंजूर शेख, विरभद्र बेलूरे, ओम गंगणे, बंडू भोजने, साक्षी बेलूरे, शिवाजी सावंत, आनंद भालेराव, रवि पवार, रामेश्वर सातपुते, दयानंद घंटे, सचिदानंद हंद्राळे, श्रीकांत उकरंडे, प्रकाश टिंगरे, कमलाकर पावटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या