Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर शहर (जिल्हा) युवक काँग्रेसचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आंदोलन


प्रतिनिधी : मुझफ्फर टिनवाले

कोल्हापूर : कोल्हापूर येथे (दि .२०) रोजी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.त्यांच्या विषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कायम वादग्रस्त तसेच एकेरी भाषा वापरून बोलत आहेत आणि इतर महापुरुष यांचे बद्दल देखील ते एकेरी भाषा वापरत आहेत तरी त्यांनी तोंडावर आवर घालावा. राज्यपाल यांनी केलेल्या वादग्रस्त विधान बद्दल कोल्हापूर जिल्हा शहर युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांनी आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी चौक येथे निषेध आंदोलन केले.

यापुढे त्यांनी अशी विधाने केल्यास युवक काँग्रेस भव्य आंदोलन करेल अशी चीथावणी युवक काँग्रेस तर्फे देण्यात येत आहे.

या निषेधार्थ कोल्हापूर शहर (जिल्हा) युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदय पोवार, युवती अध्यक्ष अंजली जाधव,दक्षिण विधानसभा युवती अध्यक्ष योगिता चव्हाण, राहुल मिनेकर, सुशांत विभुते, रोहित गाडिवडार , मकरंद कवठेकर, आदित्य कांबळे सासणे, मुझफ्फर टिनवाले,शुभम पोळ,श्रीधर धाबेकर,अक्षय शेळके,रोहित पाटील, धनंजय चव्हाण,सचिन कराळे, अनिकेत पाटील, आकाश माने, प्रदीप ढाकरे, साहेबराव चव्हाण,अमेय निकम, योगेश बुचडे असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या