प्रतिनिधी : जुबेर शेख
उस्मानाबाद : - उस्मानाबाद येथे (दि.१३) रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह उस्मानाबाद येथे मा.राष्ट्रीय वि सेवा प्राधिकरण,मा.सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली व मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद उस्मानाबाद व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद आणि जिल्हा विधीज्ञ मंडळ,उस्मानाबाद यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित सर्व सामान्य जनतेसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती,नोंदणी व प्रत्यक्ष लाभ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात आयुष्मान भारत प्रधान मंत्री जण आरोग्य योजना पात्र लाभार्त्याना मा.मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मॅडम,मा.जिल्हाधिकारी श्री.डॉ.सचिन ओंम्बासे,मा.मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.राहुल गुप्ता,मा.पोलीस अधीक्षक उस्मानाबाद श्री.अतुल कुलकर्णी,जिल्हा शल्य चिकित्सक श्री.डॉ. राजाभाऊ गलांडे या मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान कार्ड वाटप करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्यावा व ज्या पात्र लाभार्थ्यांनी अद्याप आयुष्मान कार्ड तयार करून घेतले नाही त्यांनी आपले कार्ड तयार करून घ्यावे असे आवाहन मान्यवरांकडून करण्यात आले.
आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी हे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब असून याचा लाभ कमाल मर्यादा ५ लाख रु प्रति कुटुंब प्रति वर्ष घेता येणार आहे. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी www.mera.pmjay.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी अथवा १४५५५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंव्हा संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा. अधिक सोयी करिता ह्या योजने अंतर्गत नाव शोधण्यासाठी गाव निहाय तसेच वार्ड निहाय यादी पाहण्यासाठी www.aapkedwarayushman.pmjay.gov.in ह्या संकेत स्थळाला भेट द्यावी. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारांवर ३४ विशेष श्रेणीत उपचार असून त्या मध्ये १२०९ उपचार पद्धती या योजनेच्या रुग्णालयांतर्गत पूर्णपणे मोफत उपचाराचा लाभ दिला जातो. या मध्ये प्रामुख्याने खालील विशेष सेवा उपलब्ध आहेत.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे.ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत आयुष्मान कार्ड तयार करून घेतले नाही त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.आयुष्मान कार्ड E KYC करता यावी याकरिता ग्रामी भागात गावनिहाय व शहरी भारत वॉर्ड निहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी पात्र लाभार्थ्यांनी आपले मूळ शिधा पत्रिका किंवा मा.प्रधानमंत्री यांचे पत्र व आधार कार्ड अथवा अन्य कोणतेही शासन मान्य मूळ ओळख पत्र सोबत घेऊन जवळच्या CSC केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधून आयुष्मान कार्ड करीता आवश्यक असणारी E KYC करून घ्यावी.
उस्मानाबाद जिह्यातील एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत २० अंगीकृत रुग्णालये खालीलप्रमाणे
शासकीय रुग्णालये
१ ) जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद
२ ) जिल्हा स्त्री रुग्णालय उस्मानाबाद
३ ) उपजिल्हा रुग्णालय उमरगा
४ ) उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर
५ ) उपजिल्हा रुग्णालय परांडा
६ ) स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर
७ ) ग्रामीण रुग्णालय भूम
८ ) ग्रामीण रुग्णालय वाशी
खाजगी रुग्णालये
१ ) सुविधा हॉस्पिटल उस्मानाबाद
२ ) चिरायू हॉस्पिटल उस्मानाबाद
३ ) वात्सल्य हॉस्पिटल उस्मानाबाद
४ ) नवोदय हॉस्पिटल उस्मानाबाद
५ ) श्री विठ्ठल हॉस्पिटल वाशी
६ ) कृष्णा हॉस्पिटल कळंब
७ ) साई हॉस्पिटल उमरगा
८ ) चिंचोली हॉस्पिटल उमरगा
९ ) डिग्गीकर हॉस्पिटल उमरगा
१० ) डॉ के डी शेंडगे हॉस्पिटल उमरगा
११ ) ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उमरगा
१२ ) लाईफ केअर हॉस्पिटल उस्मानाबाद
0 टिप्पण्या