Ticker

6/recent/ticker-posts

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख संभाजीराजे पलंगे यांनी दिली स्वतःच्या मालकीची दोन गुंठे जमीन दान


प्रतिनिधी : राम थोरात

तुळजापूर : उस्मानाबाद तालुक्यातील मौजे धारूळ येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानचे विषय मागील वीस वर्षापासून प्रलंबित होते. कब्रस्तानाच्या मागणीसाठी तेथील मुस्लिम समाज वेळोवेळी मागणी करत होता पण त्या मागणीला कोणत्याही पक्षाने त्यांची मागणी पूर्ण केली नाही व वेळोवेळी त्यांना फक्त आश्वासन देण्यात येत होते.

धारूळ येथील ग्रामस्थांच्या वतीने असे सांगण्यात आले की ग्रामपंचायत निवडणूक आली की प्रत्येक सदस्य हा तो मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देत होते आणि निवडणूक संपली की त्याकडे दुर्लक्ष करायचे त्यामुळे हा विषय मागील वीस वर्षापासून प्रलंबित आहे याकडे कोणाचाही लक्ष नाही.

सध्या मौजे धारूर येथे कब्रस्तानाची जागा अपुरी असल्यामुळे त्या ठिकाणी एखाद्याची मयत झाली तर जागा आपोरी असल्यामुळे मयत करण्यासाठी वेळोवेळी मयताची हेळसांड होत होती ही बाब लक्षात येताच तुळजापूर तालुकाप्रमुख संभाजीराजे पलंगे यांनी (दि.१३) रोजी तेथील ग्रामस्थांसोबत बैठक घेउन त्यांची समस्या जाणून घेतले व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने कब्रस्तान येथे अपुरी जागा असल्याचे संभाजीराजे पंलगे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांनी तात्काळ त्या बैठकीमध्ये कब्रस्तानच्या ठिकाणी असणारी त्यांच्या स्वतःच्या मालकीची दोन गुंठे  ( २००० स्क्वेअर फुट ) जागा कब्रस्तानसाठी दान देण्याचा निर्णय घेतला व त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की मी माझी दोन गुंठे (२००० स्क्वेअर फुट ) जागा ही कब्रस्तानसाठी दान देत आहे. 

या निर्णयानंतर समस्त मुस्लिम बांधवांनी त्यांचे आभार मानले व समस्त मुस्लिम बांधव आपल्या सोबत आहे असे गवाही सुद्धा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

कमी वेळामध्ये राजकारणामध्ये आलेले तालुकाप्रमुख संभाजीराजे पलंगे यांच्याकडे तालुक्यातील नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने समस्या मांडण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत व प्रत्येकाची जी अडचण आहे ते सोडवण्यासाठी ते स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सर्व जनतेची अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांची चांगलीच क्रेज पाहायला मिळत आहे. सध्या तुळजापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक लागले आहेत. त्यामध्ये शिंदे गट कोणकोणत्या ठिकाणी आपले उमेदवार देणार आहे व किती ग्रामपंचायत सदस्य व सरपंच निवडून येणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या