प्रतिनिधी : राम थोरात
तुळजापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तुळजापूर येथील पुर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन (दि.१२) रोजी माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण व आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आहे.
शहरात डॉ. बाबासाहेबांचा पुतळा असावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. अखेर सदरील मागणी पूर्ण होऊन आज भूमिपूजन करण्यात आले आहे.
आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांनी या कार्यक्रमास बोलताना सांगितले की सर्वांची मागणी पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली आहे. साहजिकच याचे अत्यंत समाधान वाटते. लवकरच शहरात पूर्णकृती पुतळा उभा असेल.
महापुरुषांच्या प्रतिमा आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात. ती ऊर्जा घेऊन तुळजापूर शहराचा अधिकाधिक विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे.
आपल्या शहरात येणारा भाविक येथे २-३ दिवस राहायला लागला तर शहराचे अर्थकारण सदृढ होईल. त्यासाठी रेल्वे मार्ग, मंदिराचे व शहराचे सुशोभीकरण करण्याचा आपला सातत्याने प्रयत्न चालू आहे.
सोबतच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेही पुतळे शहरात उभे करण्याबाबत माझा पाठपुरावा असणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती भूमिपूजन सोहळ्या दरम्यान बौध भिक्षुक धर्मगुरु भंकेश सुमंगल चिक काळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तुळजापूर नगरीचे मा. नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी, युवा नेते विनोद पिंटू गंगणे, भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, मा. नगरसेवक सचिन पाटील, रणजीत इंगळे, किशोर साठे,अमर भैय्या मगर,पंडित जगदाळे, राजाभाऊ देशमाने,औदुंबर कदम, विजय कंदले, मा. नगराध्यक्षा संगीता ताई कदम,अविनाश गंगणे,राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंखे, विशाल छत्रे,सागर कदम,मिलींद रोकडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष तानाजी कदम, राजाभाऊ ओव्हाळ तसेच सर्व माजी नगरसेवक, नगरपरिषदचे पदाधिकारी, कर्मचारी यांच्यासह तुळजापूर शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
0 टिप्पण्या