Ticker

6/recent/ticker-posts

पेंटचे डब्बे चोरी करणारी टोळी जेरबंद


प्रतिनिधी : राम थोरात 

स्थानिक गुन्हे शाखा : उस्मानाबाद येथील राधोशाम विष्णुदास बजाज यांच्या शहरातील तुळजाभवानी शॉपींग सेंटर कॉम्पलेक्स मधील बजाज ट्रेडर्स पेंटचे गुदामाचे कुलूप दि.२५-०१-२०२२ रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने बनावट चावीने उघडून आतील एशियन पेंटचे २० लिटरचे ३९ डबे चोरुन नेले होते. यावरुन राधेशाम बजाज यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. ४७ /२०२२ हा भा.दं.सं. कलम- ४६१ , ३८० अंतर्गत नोंदवला आहे.

सदर गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी- अंमलदार हे काल दि. ११-११-२०२२ रोजी उस्मानाबाद शहरात गस्तीस असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, खानापुर ता. उस्मानाबाद येथील- गणेश पोपट शेळके याने त्याच्या अन्य साथीदारांसह केला असून तो सध्या उस्मानाबाद शहरातील श्री. चित्रमंदीराजवळ आहे. यावर पथकाने लागलीच तेथे जाउन १२:३० वाजेच्यासुमारास त्यास ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुशंगाने त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने चोरी केल्याची कबुली देउन सदर चोरी ही त्याचा गावकरी- विशाल बापु बोराटे व अंबेहोळ येथील- विजय नारायण करवर यांच्या मदतीने केली असून चोरी करण्यासाठी गणेश यांची विना क्रमांकाची मो.सा. व विजय यांचा ॲटो रीक्षा क्र. एम.एच. २५ एके ०९०६ हे वापरल्याचे सांगीतले. यावर पथकाने गणेश याच्या नमूद दोघा साथीदारांनाही ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीच्या मालातील एशियन पेंटचे ९ डब्बे व चोरी करण्यासाठी वापरलेले नमूद ॲटो रीक्षा व मो.सा. असा एकुण १,१२,९९४ ₹ किंमतीचा माल जप्त केला.

यावर पोलीसांनी नमूद तीघांकडे त्यांच्याकडे अधिक कौशल्यपुर्ण तपास केला असता विजय नारायण करवर व कुरणेनगर, उस्मानाबाद येथील- स्वप्नील सतीश जेट्टीथोर यांनी उस्मानाबाद शहरातील समतानगर येथील रामदास वाघमारे यांच्या गुदामाचे कुलूप दि. ०७-११-२०२२ ते १०-११-२०२२ रोजी दरम्यानच्या रात्री तोडून आतील एशियन पेंट कंपनीच्या पुट्टीच्या २५ पिशव्या चोरी केल्याचे सांगीतले. पोलीसांनी खात्री केली असता सदर प्रकरणी आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. ३२५/२०२२ हा भा.दं.सं. कलम- ४५७, ३८० हा दि. ११-११-२०२२ रोजी दाखल असल्याचे समजले. यावर पोलीसांनी नमूद दोघांच्या ताब्यातून गुन्ह्यातील अंदाजे २८,००० ₹ किंमतीच्या पुट्टीच्या २५ पिशव्या जप्त केल्या. अशा प्रकारे स्था.गु.शा. च्या पथकाने चोरीच्या दोन गुन्ह्याचा उलगडा केला असून नमूद आरोपींसह त्यांनी चोरी करण्यासाठी वापरलेल्या नमूद दोन्ही वाहने व चोरीचा माल आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिला असून पुढील तपास चालू आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. शैलेश पवार, पोहेकॉ- हुसेन सय्यद, महेबुब अरब, पोना- अमोल चव्हाण, अशोक ढगारे, पोकॉ- रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या