प्रतिनिधी : जुबेर शेख
उस्मानाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार बच्चू कडू, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मयुर काकडे यांचेसह प्रहारचे शिष्टमंडळ आदी उपस्थित होते.
दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या त्याचा जल्लोष उस्मानाबाद प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन च्या वतीने करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी दिलेले निर्देश
१. गाव-खेड्यांमधील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग भवन तथा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार. सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि स्थानिक आमदार निधी यांच्या अर्थसहाय्याने हे दिव्यांग भवन बांधण्यात येणार
२. दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही कमी असून ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती इतकी करण्यात येईल, त्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश
३. अकोला आणि ठाण्याच्या धर्तीवर घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांची माहिती संकलित होऊन त्यांना योजनांचा लाभ देणे सुलभ होणार
४. एसटी बस आणि बेस्ट बसमधून प्रवास करीत असताना दिव्यांगांसाठी दिलेले वैश्विक ओळखपत्र ग्राह्य धरण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. दिव्यांगांसोबतच्या व्यक्तींना बस प्रवासात देण्यात येणाऱ्या ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना
५. खाजगी क्षेत्रांमध्ये दिव्यांगांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी नियुक्त समितीने दिव्यांगांयोग्य नोकऱ्यांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना देतानाच वसतीगृहात निवासाची सुविधा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
६. ग्रामीण भागात ज्या दिव्यांगांच्या घरी शौचालयाची सुविधा नसेल तिथे शौचालय बांधण्यासाठी ग्रामविकास विभागाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
७. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरी देण्याच्या प्रस्तावावर मुख्य सचिवांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या.
प्रहारच्या २५ वर्षाच्या लढ्यास बच्चू भाऊ यांच्या प्रयत्नाने यश आले आहे. तरी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षाची मागणी मान्य केली आहे. या गोष्टीच्या स्वागतासाठी मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशाच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. याचा आनंद लाडू ,पेढे व ढोल वाजवून करण्यात आला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,बाळासाहेब कसबे,जमीर शेख,नवनाथ मोहिते,शिवाजी पोतदार,महादेव खंडाळकर,बाळासाहेब पाटील,दिनेश पोतदार,बाबासाहेब भोईटे,संजय शिंदे,बालाजी तांबे,आत्माराम बनसोडे, बप्पा काशीद,आयन शेख,मिनाज शेख,दत्तात्रय पाटील,विठ्ठल चव्हाण,दत्ता पवार,सिद्राम पवार,अनिल मिसाळ,सचिन डोंगे,गजानन चव्हाण,सिमा गजानन चव्हाण,जैद सय्यद,जोरोहिन सय्यद,शायेरता सय्यद,सामाथ सय्यद,महादेवी कोकाटे ,चंद्रकांत कोकाटे,प्रशांत भांगे,चंद्रकांत चांदणे,विशाल परिट,वैशाली परिट,मुकूंद शेख,भाऊ शेख,राजेंद्र अन्नभुले,सुनिल अन्नभुले,अनिल अन्नभुल,दिपाली अन्नभुले,दत्ता मंजुळे,तेजा भोवाळ,बालाजी भोवाळ,रमेश भोवाळ,महादेव भोवाळ,विकास सावंत,गोविंदा सावंत,रमेश सावंत,रितेश घुटे,रोहिणी घुटे,वाहिनी घुट,नईम सय्यद,साखरे,सागार माळी,श्रीकांत वाघमारे,आशिफ शैख तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या