प्रतिनिधी : राम थोरात
तुळजापूर : महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. तानाजी सावंत हे (दि.११) रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता तुळजापूर येथील वरदायिनी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलला भेट दिली व तेथील रुग्णाच्या तब्येतीची विचारना केली. तसेच पुढील काळामध्ये हॉस्पिटलसाठी कसल्याही प्रकारची आवश्यकता असेल तर ती पूर्ण करण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून देण्यात आले.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हॉस्पिटलला भेट दिल्याबद्दल त्यांचा सत्कार व आभार हॉस्पिटलचे संस्थापक अष्टपैलू विशाल भैय्या रोचकरी व समस्त कर्मचारी वर्गच्या वतीने करण्यात आला.
यावेळी धनंजय मुळे, डॉ. अजिंक्य वडगळे, डॉ. ओंकार धरणे, डॉ. अभिजीत जैन, श्री तुळजाभवानी मंदिराचे महंत तुकोजी बाबा, जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुरज महाराज साळुंखे, तुळजापूर तालुकाध्यक्ष संभाजी पलंगे तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. गलांडे सर तसेच हॉस्पिटलचा सर्व परिवार व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या