Ticker

6/recent/ticker-posts

उस्मानाबाद येथील प्रभाग क्रमांक १९ मधील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी मल्हार आर्मीचे मुख्याधिकारी यांना निवेदन


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

उस्मानाबाद: उस्मानाबाद येथे मल्हार आर्मी संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २९ सप्टेंबर २०२२, रोजी मल्हार आर्मी जिल्हाध्यक्ष बालाजी वगैरे जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल खटके जिल्हा मल्हार आर्मी मार्गदर्शक अशोक गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक 19 मुख्य अधिकारी साहेब नगरपरिषद उस्मानाबाद यांना प्रभाग क्रमांक 19 मधील सुशिल नगर ,तुळजापुर नाका ,पापणास नगर ,आंबेडकर नगर साठे नगर ,बस डेपो, देवी मंदिर व सर्व प्रभाग अंतर्गत नाली काम तसेच अंतर्गत पाईप लाईन खोदकामामुळे रस्त्याची दुरवस्था झालेली असुन मागील 10 ते 15 वर्षपासून प्रभाग क्रमांक 19 मध्ये कोणत्याही प्रकारचे नवीन कामे झालेली नसुन पूर्वीचे असलेले रस्ते त्याचीही पाइपलाइन खोदकामामुळे व अंतर्गत नाली कामांमुळे अत्यांत बिकट दुरावस्था झालेली.

असुन नागरिकांना जाणे -येणे रस्त्यावरुन असहाय्य झालेले असुन सदरील रस्त्यावरील कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत अन्यथा पुढली आठ दिवसामध्ये जिल्हाधिकारी कार्यलया समोर प्रभाग क्र 19 मधील सर्व नागरिक व मल्हार आर्मी सर्व पदाधिकारी उपोषणाला बसणार आहेत. 

यावेळी मल्हार आर्मी जिल्हा अद्यक्ष बालाजी वगरे, कार्यध्यक्ष विठ्ठल खटके ,ता अध्यक्ष अशोक गाडेकर,शहर अध्यक्ष रवी देवकते ,पंकज चव्हाण ,राहुल जाधव ,नरेश लेनेकर,जित घोणे, शिवम देवकते,रतन पवार, संदीप चौगुले,दता गरड, रंजक तांबोळी, रफिक शेख, कालिदास काळे,सलीम शेख ,तानाजी पवार,राजेश मेटकरी,सचिन कासप्टें, कुर्षां खटके, व शेकडो नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या