Ticker

6/recent/ticker-posts

कोहिजन फाउंडेशनच्या विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे मा. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन


उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील कोहिजन फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने सर्वांगीन ग्रामिण विकास प्रकल्पांतर्गत विविध लोकोपयोगी कामाची सुरुवात जवळगा (मेसाई) गावात आज दि. २९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. यावेळी शेळी व कोंबडी उतपदक महिला कंपनीचे भूमीपूजन, वृक्षारोपन, नविन बंधारा जल पूजन, जलशुध्दीकरण युनिटचे लोकार्पन करण्यात येउन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले. 

याप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दयानंद वाघमारे, जिल्हा परिषद अजिरिक्त मुख्याधिकारी- श्री. विलास जाधव, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा संचालिका श्रीमती प्रांजल शिंदे, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर चे अधिष्टाता प्रो. रमेश जारे, गट विकास अधिकारी, तुळजापूर श्री. जयसिंगराव मरोड इत्यादी मान्यवर यांसह जवळगा मेसाईचे सपरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाची उपस्थितांनी वृक्षारोपनाने सुरवात करुन नमूद विविध उपक्रमांचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात मा. पोलीस अधीक्षकांनी उपस्थित ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनात जनसहभाग महत्त्वाचा असल्याचे पटवून दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या