Ticker

6/recent/ticker-posts

चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी अटक


उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे

ढोकी पोलीस ठाणे : दत्तनगर, ढोकी येथील- विकी धनंजय लोमटे यांची हिरो होंडा पॅशन प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. २५ ए ९५१५ अंदाजे २०,००० ₹ किंमतीची दि. २६-०९-२०२२ रोजी १६.०० वा. सु. ढोकी पेट्रोल पंप चौकातील ॲक्सीस बँक एटीएम केंद्रासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. यावरुन विकी लोमटे यांनी दि. २७-०९-२०२२ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ३७९ अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे गुन्हा क्र. २३१/२०२२ हा नोंदवला आहे.

सदर गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी पो.ठा. च्या सपोनि- श्री. जगदीश राऊत, पोलीस अंमलदार- सातपुते, क्षिरसागर, खोकले, थाटकर यांच्या पथकाने कौशल्यपुर्ण तपास केला. यात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एकुरगा ता. कळंब येथील- बबलु अंकुश पवार उर्फ बबन, वय २७ वर्षे यास आज दि. २९ सप्टेंबर रोजी तुळजापूर शहरातून नमूद चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेउन त्यास अटक केली असुन गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या