Ticker

6/recent/ticker-posts

गुरुपौर्णिमेनिमित्त यशवंतराव चव्हाण विद्यालयात आई-वडील व गुरूंची पूजा करून विद्यार्थ्यांनी साजरी केली गुरुपौर्णिमा

 

प्रतिनिधी : मिलिंद भांगरे

पुणे : आंबेगाव गावठाण येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, आंबेगाव वसाहत येथे गुरुपौर्णिमेचा मंगल सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने आपल्या जीवनातील तीन प्रमुख गुरु – आई, वडील आणि शिक्षक यांची पुजा करून कृतज्ञता व्यक्त केली.


कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गालावरील टिळा आणि आरतीने आपल्या आई-वडिलांचे स्वागत करून केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांनाही पुष्प अर्पण व वंदन करून त्यांचा सन्मान केला.


या सोहळ्याला मोठ्या संख्येने पालकवर्गाने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत भावनात्मक सहभाग नोंदवला.



या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक माननीय चव्हाण सर यांनी सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी आपल्या भाषणात गुरुपौर्णिमेचे महत्व सांगताना असेही नमूद केले की, “गुरु हे जीवनातील दिशा दर्शक असतात, पण आई-वडील हे पहिले गुरु असतात, त्यांच्यावरील प्रेम व आदर कायम जपणे हीच खरी गुरुपौर्णिमा आहे.”


कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्तमरित्या पार पाडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिगीते व नृत्य सुद्धा उपस्थितांचे लक्ष वेधून गेले.


अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचे व संस्कारांचे बीज रोवले जात असून, शाळेचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या