प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील दहिटणा गावामध्ये शिवसेना पक्षाची भव्य आढावा बैठक मोठ्या उत्साहात व प्रचंड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीने तालुक्यातील राजकीय वातावरण तापवले असून, शिवसेनेने निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात केल्याचे स्पष्ट चित्र यावेळी पाहायला मिळाले.
दहिटणा गावात पार पडलेल्या या बैठकीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल जाधव,शहर संघटक नितीन मस्के,संजय लोंढे पदाधिकारी,ग्रामपातळीवरील नेते, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने तालुकास्तरावर संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. दहिटणा येथे झालेली ही आढावा बैठक त्याच तयारीचा एक महत्त्वाचा भाग मानली जात आहे.
या बैठकीत तालुक्यातील प्रत्येक गट, प्रत्येक गण आणि प्रत्येक गावपातळीवरील परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. कोणत्या भागात पक्ष मजबूत आहे, कुठे अधिक काम करण्याची गरज आहे, कार्यकर्त्यांच्या अडचणी काय आहेत, तसेच जनतेच्या अपेक्षा कोणत्या आहेत, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या गाठीभेटी. इच्छुक उमेदवारांनी आपली भूमिका मांडली. पक्षासाठी केलेले काम, जनतेशी असलेला संपर्क, तसेच आगामी निवडणुकीसाठीची तयारी याची माहिती त्यांनी नेतृत्वासमोर ठेवली.
तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी प्रत्येक इच्छुक उमेदवाराशी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्या कामाचा आढावा घेतला. “पक्ष निष्ठा, जनतेशी असलेली बांधिलकी आणि संघटनात्मक कामाला प्राधान्य दिले जाईल,” असे स्पष्ट संकेत यावेळी देण्यात आले. त्यामुळे उमेदवारांमध्ये सकारात्मक उत्साह दिसून आला.
या बैठकीतून तुळजापूर तालुक्यात शिवसेनेने आपला पाया अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले. मागील काही काळात तालुक्यातील विविध गावांमधून अनेक कार्यकर्ते व समाजसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे.
दहिटणा गावात झालेल्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत, “शिवसेना हाच सामान्य जनतेचा खरा आवाज आहे,” असा विश्वास व्यक्त केला. विशेषतः तरुण वर्ग, महिला कार्यकर्त्या आणि ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता.
ही आढावा बैठक उशिरापर्यंत सुरू होती. कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने कोणतीही घाई न करता प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी यावरही चर्चा झाली.
कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील समस्या मांडल्या. त्यावर तात्काळ उपाययोजना कशा करता येतील, तसेच निवडणुकीनंतर या प्रश्नांना कसे प्राधान्य दिले जाईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
“भगवा झेंडा फडकणारच” – अमोल जाधव
या बैठकीत मार्गदर्शन करताना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा भरली. “तुळजापूर तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत असून, कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहेत. हीच ताकद येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “शिवसेना ही केवळ एक राजकीय पक्ष नसून, ती जनतेची चळवळ आहे. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना नेहमीच रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तुळजापूर तालुक्यात नक्कीच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
अनेक कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागण्याचा निर्धार व्यक्त केला. बूथ कमिटी मजबूत करणे, मतदारांशी थेट संपर्क साधणे, तसेच सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.दहिटणा गावातील नागरिकांनीही या बैठकीकडे उत्सुकतेने पाहिले. राजकीय हालचालींमुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
एकूणच दहिटणा येथे पार पडलेली शिवसेना पक्षाची आढावा बैठक ही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या बैठकीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, तालुक्यातील राजकीय समीकरणांवर याचा निश्चितच परिणाम होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
येणाऱ्या काळात तुळजापूर तालुक्यात शिवसेनेच्या आणखी बैठका, दौरे आणि जनसंपर्क कार्यक्रम होणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले. त्यामुळे आगामी निवडणूक काळात तुळजापूर तालुक्यात राजकीय रणधुमाळी रंगणार, हे निश्चित आहे.



0 टिप्पण्या