प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले तसेच युवकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते राहुल राजाभाऊ भालेकर यांनी आज अधिकृतरित्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात ज्ञानराज चौगुले साहेब यांनी राहुल भालेकर यांचे शिवसेनेत जाहीर स्वागत करत त्यांच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले,“तळागाळातील जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे आणि समाजाशी थेट नाळ जोडलेले कार्यकर्ते हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. राहुल भालेकर यांच्या प्रवेशामुळे तुळजापूर शहरात व तालुक्यात पक्षाची संघटनात्मक मजबुती वाढणार असून आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने जनतेच्या सेवेत उभी राहील.”
सामाजिक प्रश्न,युवकांचे प्रश्न,शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम तसेच गरजू घटकांसाठी केलेल्या कामामुळे राहुल भालेकर यांची परिसरात वेगळी ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत शिवसेनेने त्यांचे पक्षात स्वागत केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी सामाजिक क्षेत्रात प्रभावशाली व्यक्तिमत्व आसलेले राहूल भालेकर यांना पक्षात प्रवेश करुन तुळजापूर शहरातील विरोधी पक्षाला मोठाच धक्का दिला आहे.राहूल भालेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शहरातील व तालुक्यातील असंख्य युवक वर्ग राहूल भालेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात येणार अशी चर्चा आता सर्वत्र पसरली आहे.आता राहूल येणाऱ्या काळात कोणत्या पक्षाला धक्का देणार हे पहावे लागणार आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना राहुल राजाभाऊ भालेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की,“सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. पक्षप्रमुखांचे विचार, शिवसेनेची ध्येयधोरणे आणि उपनेते ज्ञानराज चौगुले साहेबांचे प्रभावी नेतृत्व पाहून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य अधिक जोमाने करत सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहीन.”
या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
राहुल भालेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यात शिवसेनेला बळकटी मिळणार असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


0 टिप्पण्या