प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा गावातील शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी राज्य सरकारने घेतलेल्या ऊसाच्या प्रति टन भावातून १५ रुपये कपातीच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. आज त्यांनी आपल्या व्हाट्सअॅप स्टेटसवर पोस्ट टाकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयाचा जाहीर निषेध नोंदविला.
या पोस्टमध्ये त्यांनी संताप व्यक्त करताना असे म्हटले आहे की –
"जमीन आपली, त्यात सरी आपण काढणार, विकत आणून उसाचे बियाणे आपणच लावणार, वर्षभर खर्च आपणच करणार, पाणी आपणच देणार, ऊस तोडण्यासाठी आलेल्या मजुरांचे पैसे आपणच देणार, पुन्हा तो ऊस कारखान्यात देऊन सहा महिने पैसे मिळण्यासाठी वाट बघणार आणि त्यानंतर फडणवीस म्हणतो की टनाला १५ रुपये कपात करणार. काय तुझ्या गंगाधर पंतांची पेंढ आहे का?.. आला मोठा कपात करायला!"
शेतकऱ्यांच्या भूमिकेला चालना देणारा हा संतप्त स्वर सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे उस उत्पादक शेतकरी संतापले असून, उत्पादन खर्च वाढत असताना भावात कपात हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मनोज जाधव यांनी मांडलेली ही आक्रमक भूमिका ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातील असंतोषाचे प्रतिबिंब मानली जात असून, पुढील काळात या कपातीच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनांकडून मोठा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येण्याची शक्यता आहे.

0 टिप्पण्या