प्रतिनिधी : जुबेर शेख
नळदुर्ग :पल्लवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या पुढाकाराने धाराशिव व परिसरातील महिलांसाठी “आरी वर्क व फॅशन डिझायनिंग” या एक महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी वडर वस्ती कामगार भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रशिक्षणामध्ये एकूण 35 महिला सहभागी झाल्या आहेत.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री. विजयजी जाधव, लोहारा-उमरगा साऊ महिला एकल समितीचे अध्यक्ष काशिनाथजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल चिकुंद्रे, पालावरच्या शाळा महाराष्ट्र प्रांत प्रमुख शेखरजी पाटील, बचत गट प्रमुख श्री. तायाप्पा चव्हाण, केंद्र महिला सहाय्यका प्रमुख (धाराशिव) मनीषा भडंगे मॅडम, पल्लवी बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव व आरी वर्क परि शिक्षिका ज्योती पवार मॅडम, वस्ती प्रमुख गणेश घोडके, निलेश जाधव तसेच पालावरच्या शाळेच्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लागेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा मोठे यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना जानराव यांनी मान्यवरांचे मानले.
या प्रशिक्षणामुळे महिलांना कौशल्य आत्मसात करून फॅशन डिझायनिंग व आरी वर्क क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
0 टिप्पण्या