Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्याचा गौरव:जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल ब्राँझ पदक

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

नागपूर : भारतीय प्रशासनात उत्कृष्टतेचा नवा अध्याय लिहित, ‘संपूर्णता अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध जिल्हा व तालुक्यांच्या प्रशासनाचा सन्मान करण्यात आला. नागपूर येथील आयआयएममध्ये झालेल्या महसूल परिषद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला.


नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा व तालुका विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘संपूर्णता अभियान’ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत ब्राँझ, सिल्व्हर व सुवर्ण पदक तसेच विशेष प्रमाणपत्रे देण्यात आली.


आकांक्षित जिल्हा श्रेणीतील पुरस्कार:


ब्राँझ पदक प्राप्त जिल्हाधिकारी:


किर्ती किरण पुजार – जिल्हाधिकारी, धाराशिव


डॉ. मित्ताली सेठी – जिल्हाधिकारी, नंदुरबार


अविश्यांत पंडा – जिल्हाधिकारी, गडचिरोली


विशेष प्रमाणपत्र:


बुवनेश्वरी एस. – जिल्हाधिकारी, वाशिम


आकांक्षित तालुका श्रेणीतील पुरस्कार:


सुवर्ण पदक:


जिवती (जिल्हा चंद्रपूर) – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.


सिल्व्हर पदक:


जव्हार (पालघर) – जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड़


मालेगाव (वाशिम) – जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.



ब्राँझ पदक प्राप्त तालुके व संबंधित अधिकारी:


डहाणू, विक्रमगड (पालघर) – जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड़


अहेरी, भामरागड (गडचिरोली) – तत्कालीन जिल्हाधिकारी संजय दैने, सध्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा


किनवट (नांदेड) – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


अक्राणी (नंदुरबार) – जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी


कारंजा (वर्धा) – जिल्हाधिकारी वान्मथी सी


पुसद (यवतमाळ) – तत्कालीन जिल्हाधिकारी पंकज आशिया, सध्याचे जिल्हाधिकारी विकास मीना


चिखलदरा, धारणी (अमरावती) – तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सध्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर


परांडा (धाराशिव) – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार


या कार्यक्रमात राज्यातील प्रशासकीय क्षेत्रात गुणवत्ता, कार्यक्षमता आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्याचा मानस स्पष्टपणे दिसून आला. विशेषतः दुर्गम, आदिवासी व मागास भागांतील प्रशासनाने केलेल्या कामाची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देणे, हे ‘संपूर्णता अभियान’चे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.


कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांनी अशा योजनांमुळे प्रशासनात काम करण्यासाठी नवीन उर्मी मिळते आणि जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या सेवा अधिक प्रभावीपणे राबविता येतात, असे मत व्यक्त केले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले:"संपूर्णता अभियान हे फक्त सन्मानाचे नव्हे, तर विकासाच्या दिशेने झपाट्याने काम करणाऱ्या प्रशासनासाठी प्रेरणादायक उदाहरण आहे. आकांक्षित जिल्ह्यांच्या प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे."


‘संपूर्णता अभियान’च्या माध्यमातून जिल्हा व तालुका प्रशासनाच्या कामगिरीची पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने समीक्षा होत असून, यामुळे एक सकारात्मक स्पर्धा निर्माण होत आहे. याचे परिणाम शेवटी जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीत स्पष्टपणे दिसून येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या