प्रतिनिधी : सयाजी पाटील
औसा : भिम-आण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने बिरवली येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून मयुर भाऊ साळुंके (औसा तालुकाध्यक्ष), सयाजी पाटील (प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा उपाध्यक्ष), राम गोरे, मिथुन दादा कांबळे, पवन गोरे, अल्ताफ शेख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगत, आण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनावर भाष्य केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती साधून समाजाच्या सर्वांगीण विकासात हातभार लावावा, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिम-आण्णा सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करून, भविष्यातही अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
0 टिप्पण्या