Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव पोलीस अधीक्षकांचे अंमली पदार्थविरोधी मोहिमेत सहकार्याचे आवाहन

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात निर्णायक कारवाईसाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शासनाच्या निर्देशांनुसार व धाराशिव जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने Anti Narcotics मोहीम सुरु करण्यात आली असून नागरिकांचा सक्रीय सहभाग मिळवण्यासाठी अधिकृत आवाहन करण्यात आले आहे.


अंमली पदार्थांचे सेवन, बाळगणे, वाहतूक, विक्री किंवा खरेदी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृतीसंबंधी माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांनी मोबाईल क्रमांक 8999890498 वर व्हाट्सॲप, एसएमएस किंवा कॉलद्वारे माहिती द्यावी. तसेच antinarcodhv@gmail.com या ई-मेलवरही तक्रार पाठवता येईल.


पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, माहिती देणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून नागरिकांना कुठल्याही भीतीशिवाय माहिती देता येईल.


जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईची सुटका व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार असून, नागरिकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून सहकार्य करावे, असे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या