Ticker

6/recent/ticker-posts

आगामी गणेशोत्सव नियोजनासाठी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये 21 ऑगस्ट रोजी बैठक

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर :आगामी गणेशोत्सवाचे आयोजन सुरळीत, शिस्तबद्ध व शांततेत पार पडावे, यासाठी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे गुरुवार, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 4.30 वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शहर व तालुक्यातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांना कोणताही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागू नये तसेच गणेश मंडळांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात, यासाठी पोलिस विभागाने ही बैठक बोलावली आहे.


बैठकीत गणेश मूर्ती स्थापनेसाठीची परवानगी प्रक्रिया, मिरवणूक मार्ग, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, दिवसभरातील वाजवायच्या डीजे/ध्वनीफितींवरचे नियम, वाहतूक व्यवस्था, मंडप उभारणीसाठीचे निकष याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मंडळांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील राहील, असे कळविण्यात आले आहे.


"गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती व सामाजिक ऐक्याचा सण असून तो शिस्तबद्ध आणि शांततेत साजरा करण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. वेळेवर बैठकीस उपस्थित राहावे," असे आवाहन तुळजापूर पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या