प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव – जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरलेल्या मोटरसायकलींसह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला असून, एकूण पाच मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाईत चोरीस गेलेल्या एकूण २ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीविरुद्ध येरमाळा, धाराशिव, ढोकी, तामलवाडी आणि कर्नाटक राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे तसेच पथकातील पोलीस हवालदार जानराव (पोह/327), समाधान वाघमारे (पोह/1003), नितीन जाधवर (पोना/1479), बबन जाधवर (पोना/1611), योगेश कोळी (पोअं/1029), चालक मेहबूब अरब (पोह/1248), पोलीस अमलदार प्रकाश बोईनवाड, व विनायक दहीहंडे (पोअं/693) हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना खात्रीलायक गुप्त माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीप्रमाणे इसम महादेव उर्फ गगन अरुण शिंदे, वय २२, रा. मस्सा खंड, ता. कळंब, जि. धाराशिव, याने चोरून आणलेल्या मोटरसायकली मस्सा गावातील त्याच्या घरा समोर एका शेडमध्ये ठेवलेल्या आहेत आणि तो तेथे थांबलेला आहे. पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मोटरसायकली येरमाळा, धाराशिव, ढोकी, तामलवाडी व कर्नाटक राज्यातून चोरून आणल्याची कबुली दिली.
पथकाने मोटरसायकलीची माहिती घेता सदर गुन्ह्यांची नोंद येरमाळा, ढोकी, आनंदनगर, तामलवाडी आणि कर्नाटकातील लाकाल पोलीस ठाणे, जि. बादलकोट येथे झाल्याचे निष्पन्न झाले. दोन पंचासमक्ष आरोपीकडून चोरीच्या एकूण ५ मोटरसायकली किंमत अंदाजे ₹२,६०,००० इतक्या जप्त करण्यात आल्या.
त्यानंतर सदर आरोपी महादेव शिंदे यास व जप्त मुद्देमालासह पुढील कार्यवाहीसाठी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व पथकाने एकत्रित प्रयत्नातून पार पाडली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे, असे नागरिकांतून सांगण्यात येत आहे.
0 टिप्पण्या