प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर: आज तुळजापूर तालुक्यातील मौजे मानेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. सुवर्णा लहु सगट यांची एकमताने निवड करण्यात आली. विशेष म्हणजे तुळजापूर तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) कडून पहिल्यांदाच ‘लाडकी बहीण’ या संकल्पनेतून महिला उपसरपंच निवडून आली आहे. यामुळे महिला सशक्तीकरणाला नवा टप्पा लाभल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
सदर निवड ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार प्रेरणा मानून, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सचिव संजय मोरे, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, उपनेते ज्ञानराज चौगुले, सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते आणि जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या निवडीनंतर तुळजापूर शिवसेना तालुक्याच्या वतीने सौ. सुवर्णा सगट यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख अमोल जाधव, उपशहराध्यक्ष रमेश काका चिवचिवे, शिवसेना नेते सोमनाथ गुडे, शहाजी हाके, नेहरू बंडगर, बालाजी लकडे, दयानंद गडदे, भैरू माने, लक्ष्मण माने, केशव सगट, केरबा माने आणि मानेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. सुवर्णा सगट यांची ही निवड स्थानिक महिलांमध्ये नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे मत तालुक्यातून व्यक्त होत आहे. ग्रामविकासाच्या दिशेने त्या प्रभावी कामगिरी करतील, असा विश्वास शिवसेना पक्ष आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या