प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव - स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यांना एक निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात बांधकाम कामगारांना गृह उपयोगी इतर वस्तूंचे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे मुलाखतीचे पत्र देऊन, ठराविक दिवशी वस्तू वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत कामगार कल्याणकारी मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यापुढे बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करून मुलाखतीची तारीख निश्चित करता येणार आहे. त्या तारखेनुसार संबंधित ठिकाणी उपस्थित राहून कामगारांना गृह उपयोगी वस्तू वितरीत केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे वितरण प्रक्रियेतील गोंधळ, अपुऱ्या माहितीमुळे होणारे गैरसमज, आणि अपघात यांना आळा बसेल.
या निर्णयाचे स्वागत विविध कामगार संघटनांनी केले आहे.चांद शाह स्वतंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटना बुलढाणा, अमोल पोहेकर महाराष्ट्र बांधकाम जनरल कामगार युनियन अमरावती, संदिप कटबु रिपब्लिकन कामगार संघटना धाराशिव ,गणेश भोसले महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना,निलेश उजगरे स्वराज्य असंघटित कामगार संघटना छ. संभाजीनगर,अणि मनीष गौरखेडे संघर्ष बांधकाम कामगार संघटना वर्धा यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे.
आमची गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होती. वस्तू वाटप प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी अपघात घडले होते, काही ठिकाणी कामगारांचा मृत्यूही झाला होता. हे टाळण्यासाठी वस्तू वाटप ऑनलाईन व्हावे, अशी आम्ही वारंवार मागणी केली होती. ती मागणी आज पूर्ण झाली याचा आम्हाला आनंद आहे.
आनंद भालेराव
स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटना
0 टिप्पण्या