Ticker

6/recent/ticker-posts

जनता दरबारात समस्या ऐकून तत्काळ उपाययोजना – सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांची नागरिकांशी थेट संवाद साधताना कारवाईचे आदेश

प्रतिनिधी : अशोक गरड 

लातूर : महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


या कार्यक्रमात शेतकरी, कामगार, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रामुख्याने पीकविमा, ट्रान्सफॉर्मर, अनुकंपा भरती, नोकरी, बदली, शिक्षण, पिण्याच्या पाण्याचा अभाव, तसेच शहरातील वाहतूक कोंडी यासारख्या विविध विषयांवर नागरिकांनी आपली मते व्यक्त केली.

ना. पाटील यांनी प्रत्येक समस्येची गंभीर दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले. काही प्रकरणांमध्ये समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


या जनता दरबारावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बबन आबा भोसले, शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, नवनाथ अल्टे, राहुल बनसोडे, कबीर शेख, विशाल अवटी, टिल्लू शेख यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जनता दरबाराच्या माध्यमातून शासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत होत असल्याचे मत नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या