Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी कडून डॉ.स्नेहा सोनकाटे यांना उमेदवारी जाहीर


प्रतिनिधी: जुबेर शेख

तुळजापूर: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होताच सर्व राजकीय पक्षांकडून विविध विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे.त्यातच आज तुळजापूर विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी कडून डॉ. स्नेहा सोनकाटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आता तुळजापूर विधानसभेसाठी चौरंगी लढत होणार हे निश्चित आहे. 


येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महायुतीचा उमेदवार व महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.यामध्ये महायुतीकडून भाजप पक्षाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची नाव निश्चित मानले जात आहे. तर महाविकास आघाडी मधून काँग्रेसची जागा असल्यामुळे धीरज पाटील यांचे नाव सध्या चर्चेत आहे.येणाऱ्या काळात महायुतीचा उमेदवार व महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या