प्रतिनिधी:अशोक गरड
उजनी: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष वसीम बोपले यांच्या वाढदिवसानिमित्त औसा युवक विधानसभा अध्यक्ष अशोक गरड यांच्यावतीने उजनी येथील कन्या शाळेमध्ये मुलींना फळ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी औसा विधानसभा अध्यक्ष अशोक गरड,तालुका उपाध्यक्ष राजू पटेल,मन्सूर रुईकर,काशिनाथ घोडके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या