प्रतिनिधी:फिरोज पटेल
उमरगा: उमरगा येथे उमरगा-लोहारा तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे पंचनामे न करता सरसकट शासनाने मदत जाहीर करावी व धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष ऍड धीरज पाटील यांना तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खालच्या दर्जाची भाषा वापरून टीका केली याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस व धाराशिव जिल्हा काँग्रेस वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सचिव विजय वाघमारे,सेवादल शहर अध्यक्ष बाबा मस्के,बलभीम अंबुलगे,अश्लेष भैया शिवाजीराव मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर,युवक जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड,ऍड इरफान जमादार,युवक तालुका उपाध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड,युवक शहर अध्यक्ष सोहेल इनामदार,अप्पा कारभारी,प्रकाश चव्हाण,सचिन सुतके,अभिमन्यू भोसले,जीवन सरपे,प्रशांत सरपे,सिद्धार्थ सुरवसे,अभिमन्यू कांबळे,राहुल कांबळे,युवक काँग्रेसचे प्रवक्ते अमित रेड्डी उपस्थित होते.
0 टिप्पण्या