प्रतिनिधी: फिरोज पटेल
उमरगा: उमरगा तालुक्यातील ॲड.शितल चव्हाण फाउंडेशन व प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण वाचनालय मूळज तर्फे बार असोसिएशन उमरगा येथे निवडून आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
ॲड.एम.पी.कोथिंबीरे ( बार असोसिएशन उमरगा
अध्यक्ष ),ॲड.एम.एन बनसोडे ( बार असोसिएशन उमरगा उपाध्यक्ष ),ॲड.एस.एस बिराजदार ( बार असोसिएशन उमरगा सचिव ),ॲड.कृष्णा माधवराव पाटील ( बार असोसिएशन उमरगा कोषाध्यक्ष ),ॲड.भाग्यश्री बिभीषण गुंड पवार ( बार असोसिएशन उमरगा सहसचिव ) उपस्थित होते. व या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.जी.के गायकवाड होते.
या सत्काराच्या कार्यक्रमात ॲड.शितल चव्हाण म्हणालेत की, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एकूण मतदारांपैकी बहुसंख्या मतदारांनी मतदारांचा अधिकार बजावलेला आहे.अशा वातावरणात ही निवडणूक पार पडलेली आहे.यावर्षीच मी या बारची मेंबर झालो आहे आणि पहिल्यांदाच मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
बार असोसिएशन उमरगा नवनिर्वाचित निवडून आलेले पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमच्या फाउंडेशन मध्ये एका वकिलाच्या हस्ते झालेला आहे.याचा मला सार्थ अभिमान आहे.अँड.प्रवीणचंद तोतला बोलताना म्हणाले की अँड.शितल चव्हाण प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारे प्राणी आहे आणि सामाजिक भान ठेवून अडीअडचणी सोडविणारे अतिशय मन लावून काम करणारे व्यक्तिमत आहे.अँड.एम. पी कोथिंबीरे बार असोसिएशन उमरगा अध्यक्ष यांनी बोलताना म्हणाले की आज आनंदाचा दिवस असल्यामुळे जास्त काय बोलणार नाही. समाजामध्ये जे बोललेल्या गोष्टी पेपरमध्ये पुस्तकामध्ये छापल्या जातात सरस्वती हे ग्रेट आहे.सरस्वती घेतल्यानंतर आपण कितीबी कमवतो (अध्ययन आज्ञानी माणसांनी शिक्षण शिकावे विधा सरस्वती).
आज तुम्ही आम्हाला बोलावले आमचा सत्कार केला त्याबद्दल उमरगा बार असोसिएशन तर्फे मी तुमचे आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर अँड.अक्षय तोतला,अँड .प्रवीणचंद तोतला,अँड.एस एस पवार,अँड.अरुण सूर्यवंशी,अँड .जे.बी शेख,अँड.एस.एस सुरवसे,अँड.अर्चना जाधव,अँड.घोडके,अँड .एन.के जोशी,अँड.मंगेश चिंचोलीकर,अँड.माधव चिंचोलीकर,अँड.बी.जी माळी,अँड.खाजा शेख इतर एडवोकेट वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुऋसाचालन अँड.खाजा शेख यांनी केले व आभार प्रदर्शन अँड.शहाजी शिंदे यांनी केले.
0 टिप्पण्या