Ticker

6/recent/ticker-posts

उमरगा येथे भारतीय माजी सैनिक संघटना यांच्या वतीने महसूल दिन साजरा

प्रतिनिधी: फिरोज पटेल

उमरगा: उमरगा येथे भारतीय माजी सैनिक संघटना,उमरगा यांच्या वतीने महसूल दिन साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद येरमे (तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,उमरगा) यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आयोजित मेळावा मध्ये बोलताना तहसीलदार यांनी असे सांगितले की,मी माझ्या परीने शंभर टक्के यशस्वीरीत्या भारतीय माजी सैनिक संघटना उमरगा येथील व माजी सैनिक यांच्या कोणत्याही प्रकारची अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणारं आहे. 

त्यानंतर नायब तहसीलदार भारती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व सर्व कामे प्रमाणिक पणे करण्यात येईल अशी माहिती  दिली व भारतीय माजी सैनिक संघटना उमरगा येथील पदाधिकारी यांच्या सत्कार करण्यात आला.नायब तहसीलदार काजळे साहेबांनी सर्व माजी सैनिक संघटना पदाधिकारी यांचा फुले देवून सत्कार केला.व तसेच भारतीय माजी सैनिक संघटना पदाधिकारीनी त्यांचा समस्या सोडविण्याचे काम करण्यात येईल असे देखील सांगितले.

भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष शहाजी निवृत्तीराव चालुक्य तहसीलदार साहेबांना आपल्या भाषणात सांगितले की,शाखा अध्यक्ष व टोटल ५९ जण उपस्थित होते.व उपस्थित नसलेले माजी सैनिक यांच्या सुध्दा महसुली अडचणी सोडविणे असे आपल्या भाषणात म्हणतात. नेताजी काळे माडज शाखा अध्यक्ष देशाचे रक्षण करणाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावे.आनंद बलभिम माने दाबका माझी सैनिक युध्दात विकलांग व्यक्तीं आहेत महाराष्ट्र शासन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यांनी आपल्या भाषणात  माजी सैनिकाच्या अडचणी आहेत ते शासन स्तरावर सोडविण्यात असे म्हणतात. गेल्या वर्षी माजी सैनिक अहवाल मागितला असता तहसीलदार साहेब आमच्याकडे उपलब्ध नाही महाराष्ट्र शासनाने दिलेले गौरवपत्र तहसीलदार साहेबाना दाखविले.दत्तात्रय जगताप महालिंगरायवाडी अध्यक्ष .भारतीय माजी सैनिक संघटना सैनिकाला फक्त सीनियरचे आदेश पाळणे त्यांच्या रक्तामध्ये भिनलेले असते.सैनिकाचे प्रश्न सोडविण्यासाठी मासिक केव्हा त्रिममासिक एक बैठक तहसील कार्यालय उमरगा येथे तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली व्हावे.असे सुचविले भारतीय माजी सैनिक सचिव अशोक सुरवसे संचालक गोविंद काळे शाखा अध्यक्ष काशिनाथ चौधरी आदिनाथ घोरपडे संचालक किशोर गायकवाड घनश्याम पाटील सर्व संचालक व भारतीय माजी सैनिक संघटना व माजी सैनिक कार्यक्रमाला उपस्थित होते.

माजी सैनिकाचे पत्नीचे सत्कार तहसील कर्मचाऱ्याने केले .व माजी सैनिकाचे असंख्य पत्नी कार्यक्रमाला उपस्थित होते.व तहसीलदार व नायब तहसीलदार व तहसील कर्मचारी यांच्या सत्कार भारतीय माजी सैनिक संघटना तर्फे करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या