पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रविण मोरे
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ' शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ' हे नाव दिले तसेच ठाकरे गटाने दिलेल्या तीन पर्यायांपैकी ' मशाल ' हे चिन्ह दिले. मात्र आता उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याचे कारण उद्धव ठाकरे गटाची मशाल अडचणीत आली आहे.
समता पार्टी या पक्षाने मशाल या चिन्हावर दावा केला आहे. मशाल हे चिन्ह आमचे असून या चिन्हावर आमचाही उमेदवार अंधेरी निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. तसेच मशाल चिन्ह आमचे असून यासाठी निवडणूक आयोगाकडे दावा करणार असल्याचेही समता पार्टीच्या नेत्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून मशाल राहणार की जाणार हे पाहावे लागेल.
जर पुढील काळातत ठाकरे गटाचे मशाल हे चिन्ह जर गेलं तर केंद्रीय निवडणूक आयोग नवीन चिन्ह कोणत मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
0 टिप्पण्या