Ticker

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग न्युज . : भाजप नेत्याने स्वतःवर गोळी झाडली .


महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी : राम थोरात

बीड : बीडमधून एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.दुपारी गोळीबाराचा आवाज आल्याने आजूबात्यांनी आज पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे.जूचे तसेच बियाणीचे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली.

तत्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना कळल्यावर घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिस देखील तत्काळ घटनास्थळी पोहचले असून तपास चालू आहे. 

बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याची मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ही बातमी माहीत होताच संपूर्ण शहरांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पुढील तपास करण्यासाठी व नेमकं कारण काय आहे याची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत व पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या