Ticker

6/recent/ticker-posts

निवडणूक आयोगाचा चिन्हाबद्दल मोठा निकाल ! ठाकरेंना मिळाले, पण शिंदेंना ...


महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी : राम थोरात

दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला चिन्हांचे पर्याय सांगायला सांगितले होते. त्यानुसार आधी उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि नंतर शिंदे गटाकडून चिन्हांचे प्रत्येकी तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले. परंतू दोन्ही गटाकडून देण्यात आलेल्या पर्यायांत त्रिशूळ आणि उगवता सुर्य ही चिन्हे समान होती. त्यामुळे निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ' मशाल ' हे चिन्ह दिले आहे. मात्र शिंदे गटाला झटका देत कुठलेही चिन्ह दिले नाही. शिंदे गटाला पुन्हा एकदा पर्याय देण्यास सांगितले आहे. तसेच निवडणूक आयोगाने त्रिशुळ आणि गदा ही दोन्ही चिन्हे नाकारल्याची माहिती समोर येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या