पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रविण मोरे
दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि थेट शिवसेना हे नाव वापरण्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला मनाई केल्यानंतर दोन्ही गटांनी पर्यायी नावे आणि चिन्हे यांचे पर्याय सांगायला सांगितले होते. त्यानुसार आधी उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि त्यानंतर शिंदे गटाकडून प्रत्येकी तीन नावांचे पर्याय आणि तीन चिन्हांचे पर्याय यांची यादी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली. परंतू विशेष बाब म्हणजे दोन्ही गटाकडून देण्यात आलेल्या नावांमध्ये बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख होता तसेच त्रिशूळ आणि उगवता सुर्य ही चिन्हे समान होती. त्यामुळे निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला ' बाळासाहेबांची शिवसेना ' हे नाव दिले गेले आहे. तर उद्धव ठाकरे गटाला ' शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ' हे नाव मिळाले आहे.
0 टिप्पण्या