महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी : राम थोरात
मुंबई: काल शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर अनेक शिवसैनिकांना वाईट वाटले. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगा पुढे चिन्हांचे पर्याय आणि पक्षासाठी नाव देखील सुचवण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीमध्ये पत्राचा घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले संजय राऊत यांचे काय म्हणणे आहे, हे आपण पाहूया.
कदाचित शिवसेनेचे नवीन चिन्ह क्रांती घडवून आणेल. आमच्यामध्ये शिवसेनेचे स्पिरिट असल्याचे सांगत यातूनही चांगलेच होईल ' असे ते म्हणाले. " याआधी देखील जनसंघ काँग्रेस सारख्या पक्षाने चिन्ह गोठवली आहेत. त्यांच्यावर तशी वेळ आली होती. मात्र त्यानंतर देखील हे पक्ष मोठ्या ताकदीने उभे राहिले आणि प्रसिद्ध देखील आले " असे ते म्हणाले.
0 टिप्पण्या