Ticker

6/recent/ticker-posts

हडपसर येथे भिषण अपघात ; १ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी

हडपसर प्रतिनिधी : शोहेब शेख

हडपसर : पुणे - सोलापुर महामार्गावरील हडपसर गाडीतल येथे भरधाव कंटेनरने चार रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी ( ता . २ ९ ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे . या अपघातात १ जण ठार तर ३ गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे . मिळालेल्या माहितीनुसार , पुणे - सोलापुर महामार्गावरून सिमेंटचा कंटेनरने भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने चालला होते . कंटेनर हडपसर गाडीतळाजवळ सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आला असता , एक दुचाकी सोलापूर रस्त्यावरून विरुद्ध दिशेने येत होते . तेव्हा कंटेनर चालकाने दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न केला , तेव्हा चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि प्रथम झाडाला धडक दिली . यात झाड उन्मळून खाली पडले . त्यानंतर कंटेनरने रस्त्यावरून जात असलेल्या चार रिक्षांवर पडला . या अपघातात रिक्षांचा चक्काचूर झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे . या रिक्षांमध्ये प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान , अपघाताची माहिती मिळताच , हडपसर पोलीस व अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले . क्रेनच्या सहाय्याने कंटेनरला बाजूला काढण्याचे काम सुरु आहे . या अपघातात कंटेनरच्या खाली सापडलेल्या प्रवास्यांना बाहेर काढण्यात येत आहे . तर या कंटेनरच्या क्लिनर जागीच मृत्यू झाला आहे . तर ३ गंभीर जखमी झाले आहेत . त्यांच्यावर हडपसर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या