Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात २९ सप्टेंबर रोजी वैद्यकीय व दंत चिकित्सक शिबीर

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दिनांक २९ सप्टेंबर रोजी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.धनंजय चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य वैद्यकीय व दंत चिकित्सक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सर्व विभागातील तज्ज्ञ डॉक्टर आपली सेवा देणार आहेत.


या शिबिरात हाडांचे तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, नेत्रतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, रक्तदाब व मधुमेह तज्ञ, मुख व स्तन कर्करोग तज्ञ तसेच दंत चिकित्सक उपलब्ध राहणार आहेत. विशेष म्हणजे हे फक्त तपासणीपर्यंत मर्यादित न राहता, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, त्यासाठी आवश्यक पूर्व तपासण्या आणि शस्त्रक्रियेनंतरच्या तपासण्या देखील करण्यात येणार आहेत.


तसेच रुग्णांसाठी डेंटल वॅनची सोयही करण्यात आली असून, जास्तीत जास्त रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमळे सर यांनी दिली आहे. तर त्यांच्यासोबत नोडल ऑफिसर म्हणून डॉ.श्रीधर जाधव,डॉ. गणेश पाटील हे असणार आहेत.


त्यांनी पुढे सांगितले की, "२९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या शिबिराबाबतची माहिती सर्वांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवावी, ज्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचून रुग्णांना या शिबिराचा लाभ घेता येईल."


या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ञ डॉक्टरांच्या सेवांचा एकाच ठिकाणी लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या