प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटाच्या काळात शिवसेनेच्या वतीने सातत्याने मदतकार्य राबवले जात असून, तालुक्यातील विविध गावांमध्ये पूरग्रस्तांना किराणा किटचे वाटप करण्यात येत आहे.
कुन्सावळी, बोळेगाव, मानेवाडी या गावांनंतर आता वडगाव देव येथेही शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. या मदतकार्यात तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव आघाडीवर असून, त्यांच्या कार्याची संपूर्ण तालुक्यात प्रशंसा होत आहे. नेतेमंडळींना पाठीमागे टाकत, स्वतः लोकांच्या दुःखात धावून जाणारा समाजसेवक म्हणून ते ग्रामस्थांमध्ये ओळखले जात आहेत.
“ज्या ठिकाणी दुःख, त्या ठिकाणी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन,” असा निर्धार व्यक्त करत अमोल जाधव यांनी पूरग्रस्तांना धीर दिला आहे. गावागावांत जिथे जिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्या ठिकाणी शिवसेना कार्यकर्ते तत्परतेने पोहोचून आवश्यक साहित्याचे वाटप करत आहेत.
पूरग्रस्त कुटुंबांच्या चेहऱ्यावर थोडाफार दिलासा उमटवण्यासाठी केलेले हे मदतकार्य खऱ्या समाजसेवेचे उदाहरण ठरत असून, ग्रामस्थांकडून अमोल जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.
यावेळी संभाजी नेपते,शहाजी हाके,स्वप्निल सुरवसे,आप्पा पाटील,राहूल शिंदे,विकास जाधव,मीनाताई सोमाजी,राधाताई घोगरे,कपिल देवकते,रवि देवकते तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या