प्रतिनिधी : प्रवीण मोरे
पुणे : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कुगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यमान सदस्य नवनाथ अवघडे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ध्वजारोहण करून राष्ट्रगीत झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पिशव्या, वह्या, पेन, पेन्सिल, पट्टी यांसह इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता होऊन त्यांचा अभ्यास अधिक सुलभ व प्रेरणादायी होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आनंदाने साहित्य स्वीकारत मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापकांनी मान्यवरांचे आभार मानून केले. हा उपक्रम गावात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा ठरला.
0 टिप्पण्या