Ticker

6/recent/ticker-posts

श्री तुळजाभवानी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची सूचना: मास्क आणि सोशल डिस्टन्स राखणे बंधनकारक

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात दरवर्षी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी तुळजापूर शहरात दाखल होत असतात. तसेच भाविक आपला कुलधर्म व कुलाचार पार पाडण्यासाठीही या ठिकाणी येतात.


मात्र सद्य:स्थितीत कोरोनासारख्या विषाणूंच्या नविन धोक्याच्या पार्श्वभूमीवर, मंदिर व्यवस्थापनाकडून भाविकांना काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दिनांक ७ जून २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी श्री देवींच्या दर्शनासाठी येताना मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे व सोशल डिस्टन्स राखणे बंधनकारक करण्यात आले आहे.


ही सूचना सर्व भाविक, पुजारी व नागरिकांनी गांभीर्याने घ्यावी, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या