Ticker

6/recent/ticker-posts

लाचखोरीप्रकरणी पोलीस निरीक्षक शेळके व महिला पोलीस नाईक लोखंडे निलंबित

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव:छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र व पोलीस अधीक्षक श्री. रितू खोखर यांच्या आदेशाने लाचखोरी प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.


आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. 235/2025 नुसार, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7, 7(अ), 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार पोलीस निरीक्षक मारोती निवृत्ती शेळके आणि महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे यांच्यावर कारवाई करत त्यांना आज दिनांक 27 जून 2025 रोजी निलंबित करण्यात आले आहे.


ही कारवाई विभागातील शिस्तबद्ध कार्यपद्धती राखण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कडक पाऊले उचलण्याच्या धोरणाचा भाग असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या