प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर पंचायत समितीचे नुतन गटविकास अधिकारी श्री. भंगरदिवे यांनी नुकतेच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने त्यांचे भरघोस स्वागत करण्यात आले.
शिवसेना तुळजापूर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्वागत समारंभात तालुकाध्यक्ष अमोल जाधव, शहराध्यक्ष बापुसाहेब भोसले, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष गणेश नेपते, मोहन भोसले, प्रशांत मस्के, राजाभाऊ जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात गटविकास अधिकारी श्री. भंगरदिवे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
गटविकास अधिकारी भंगरदिवे यांनी उपस्थितांचे आभार मानत तुळजापूर तालुक्याच्या ग्रामीण विकासासाठी आपल्या पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गावपातळीवर आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांबाबत ग्रामपंचायतींशी समन्वय साधून कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमात एकात्मतेचे व विकासाभिमुख कामकाजाचे वातावरण दिसून आले. नवीन गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वागतास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया लक्षवधी ठरली.
0 टिप्पण्या