Ticker

6/recent/ticker-posts

वडगाव बुद्रुक भागातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी शिवसेनेचे निवेदन

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

पुणे – वडगाव बुद्रुक जुन्या बसस्टॉप परिसरात होणारा पाणीपुरवठा अत्यंत दूषित स्वरूपाचा असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात सध्या ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विभाग प्रमुख गणेश काशिनाथ सूर्यवंशी यांनी मा. महाराष्ट्र आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


या भागातील पिण्याचे पाणी आरोग्यास अत्यंत अपायकारक ठरत असल्याचे सांगून सूर्यवंशी यांनी या संदर्भात पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट केले आहे. या परिसरात 300 हून अधिक घरे असून दररोज अनेक नागरिक रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत हा विषय गंभीर बनला असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


सदर निवेदन दिनांक १० जून २०२५ रोजी सादर करण्यात आले असून, या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या