Ticker

6/recent/ticker-posts

“टीबी मुक्त भारत” मोहिमेला आयुष्मान आरोग्य मंदिर अपसिंगा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद – १०९ संशयित रुग्णांचे एक्स-रे, उपचार सुरू

प्रतिनिधी : पवन वाघमारे

तुळजापूर आज दिनांक २३ जून २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मसला खु. अंतर्गत “टीबी मुक्त भारत” अभियानाच्या अनुषंगाने गावातील टार्गेट की पॉप्युलेशनचे Hand Held X-ray मशीनच्या साहाय्याने तपासणी करण्यात आली. या मोहिमेची सुरुवात तालुक्यात प्रथम आपसिंगा येथे झाली. उद्घाटन आयुष्मान आरोग्य मंदिर जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा व सरपंच सौ. मनिषाताई यल्लाळ मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.


ही मोहीम मा. DHO डॉ. सतीश हरिदास सर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बनसोडे सर यांच्या सूचनेनुसार व THO डॉ. रफिक अन्सारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेचे नियोजन MO डॉ. श्रद्धा कदम मॅडम यांच्या पुढाकाराने, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी CHО डॉ. माळी सर यांच्या उपस्थितीत पार पडली.


या मोहिमेत १०९ संशयित क्षयरुग्णांचे एक्स-रे करण्यात आले, तर ५० सिम्प्टोमॅटिक रुग्णांचे स्फुटम नमुने घेण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना क्षयरोगासंदर्भात जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. संशयित रुग्णांची Nikshay पोर्टलवर नोंद करून आवश्यकतेनुसार तत्काळ उपचार सुरू करण्यात आले.


या मोहिमेस ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आरोग्य सेवक श्री. बनसोडे साहेब, आरोग्य सेविका क्षीरसागर सिस्टर, अर्धवेळ परिचारिका अनिताआई क्षीरसागर, आशाताई अंकीता नकाते, रेशाताई सुरवसे, अन्नपूर्णाताई सोनवणे, अर्चनाताई देशमुख, रेश्मा सय्यद यांचे विशेष योगदान लाभले. सर्व कर्मचाऱ्यांना “टीबी मुक्त भारत” अभियानासंदर्भात मार्गदर्शनपर प्रशिक्षणही देण्यात आले.


कार्यक्रमात STS श्री. महेश पाठक, श्री. संतोष धोत्रे, श्री. रामेश्वर जाधव, X-Ray टेक्निशियन, तसेच १०२ वाहन चालक श्री. सलगरे यांनी विशेष मेहनत घेतली.


"आरोग्य हीच खरी संपत्ती" या तत्वावर आधारित अशा मोहिमा खऱ्या अर्थाने गावपातळीवर आरोग्य जागृतीस व उपचारास चालना देतात," असे मत या वेळी काही ग्रामस्थांनी व्यक्त केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या