Ticker

6/recent/ticker-posts

दाबका येथील अजिज मोहसीन पटेल यांचे ९२.८०% टक्के घेऊन घवघवीत यश

प्रतिनिधी : जुबेर शेख 

उमरगा: उमरगा तालुक्यातील दाबका येथील अजिज मोहसीन अब्दुल पटेल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आयोजित दहावीच्या परीक्षेत ९२.८०% गुण मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. अजिज यांनी डी. आर. शेंडगे स्कूलमधून शिक्षण घेतले असून त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे.


अजिजच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, मित्रमंडळी आणि गावकरी यांच्याकडून त्याचे भरघोस अभिनंदन करण्यात येत आहे. सर्वांनी त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून तो भविष्यातही असेच यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.


अजिजचे यश हे उमरगा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या