Ticker

6/recent/ticker-posts

"समाजसेवा,संवेदनशील पत्रकारिता आणि माणुसकीचा प्रवास – श्री. मनोज जाधव"

 

वाढदिवसानिमित्त विशेष अग्रलेख


"समाजसेवा,संवेदनशील पत्रकारिता आणि माणुसकीचा प्रवास – श्री. मनोज जाधव"


आज आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतोय की समाजसेवक, रुग्णसेवक, संवेदनशील पत्रकार आणि आमचे मार्गदर्शक श्री.मनोज जाधव यांचा आज वाढदिवस आहे. वीर महाराष्ट्र न्यूजच्या संपूर्ण टीमकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि उत्तम आरोग्य, यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.


मनोज जाधव हे केवळ एक नाव नाही, तर एक चळवळ आहे – समाजहितासाठी अविरत धडपड करणारा एक झपाटलेला कार्यकर्ता. गरजू रुग्णांची सेवा असो, संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देणे असो किंवा भ्रष्टाचाराविरोधात निडरपणे आवाज उठवणे असो – त्यांनी प्रत्येक भूमिकेतून आपल्या कामाचा ठसा उमठवला आहे.


पत्रकारितेमधील त्यांचा प्रवास हा नुसता बातम्या देणारा नव्हे, तर समाजात सकारात्मक बदल घडवणारा ठरला आहे. अनेक वेळा त्यांनी दुर्लक्षित घटकांचे प्रश्न समाजासमोर आणले, प्रशासनाला जागे केले आणि न्याय मिळवून दिला. त्यांच्या लेखणीला धार आहे, पण त्याचबरोबर त्या लेखणीमध्ये माणुसकीचा स्पर्शही आहे.


घरातले मोठे बंधू म्हणून त्यांनी आपल्या परिवाराला सदैव साथ दिलीच, पण त्याही पुढे जाऊन त्यांनी संपूर्ण समाजाला आपल्या परिवारासारखं जपलं. अशा व्यक्तीमत्वाला वाढदिवसाच्या केवळ औपचारिक शुभेच्छा देऊन समाधान होत नाही – त्यांचा आदर्श घेणे आणि त्यांच्या कार्याला पुढे नेणे हेच खरे अभिवादन ठरेल.


आजच्या दिवशी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या कार्याचा विस्तार होवो आणि ते समाजासाठी आणखी अनेक प्रेरणादायी पायाभरणी करतील, हीच मनोमन प्रार्थना.


मनोज जाधव सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


मा.जुबेर श. शेख 

मुख्य संपादक 

तसेच

वीर महाराष्ट्र न्यूज परिवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या