Ticker

6/recent/ticker-posts

औसा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बिनविरोध विजय


प्रतिनिधी : अशोक गरड 

औसा : औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व 15 संचालक बिनविरोध निवडून आले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आणि संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोषभाऊ सोमवंशी यांचे संघावरील वर्चस्व कायम राहिले आहे.

सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी औसा तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2025 होती. शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक संचालक पदासाठी फक्त एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणुकीची गरज भासली नाही.

बिनविरोध निवडून आलेले संचालक:

संस्था मतदारसंघातून –

संतोष ज्ञानोबा सोमवंशी

शिवाजी माधवराव हांडे

मारुती गोरखनाथ मगर

नंदकुमार नानासाहेब साळुंके

गणेश प्रल्हाद जाधव


वैयक्तिक शेतकरी मतदारसंघातून –

शेखर प्रल्हाद चव्हाण

महादेव शामराव पाटील

केशव तात्याराव डांगे

श्रीधर मनोहर साळुंके

बालाजी सुग्रीव धुमाळ


अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून –

राजीव केशव कसबे


इतर मागासवर्गीय मतदारसंघातून –

सत्यभामा गणपतराव माळी


महिला मतदारसंघातून –

सविता अरविंद जाधव

मायाबाई राजेंद्र साळुंके


भटक्या जाती-जमाती मतदारसंघातून –

नवनाथ व्यंकट लवटे


सर्व उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत वैध ठरले, त्यामुळे कोणत्याही उमेदवाराविरोधात निवडणुकीची गरज भासली नाही.

शेतकरी वर्गातून स्वागत

औसा तालुका खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध निवडणुकीमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. संघाच्या सशक्त नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी अधिक चांगल्या योजना राबविल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नवनिर्वाचित संचालक मंडळाला शेतकरी व हितचिंतकांकडून शुभेच्छा मिळत असून, संघाच्या पुढील वाटचालीबाबत सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या