Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून 24 तासात अटक


प्रतिनिधी : मुदस्सर शेख 

लातूर:याबाबत थोडक्यात माहिती अशी की काल दिनांक 17/10/2024 रोजी सकाळी शिवाजी देवकर नावाच्या इसमाचा लोखंडी कत्तीने मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती.मयताच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्याद वरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे काही व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पथक तयार करून रवाना करण्यात आले होते. 

सदरचे पथक गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध होते.दरम्यान पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुन्ह्यातील फरार आरोपी नामे 
1) अजय सुनील मुद्दे, वय 25, वर्ष राहणार बाबा नगर, दगडी कमान, खाडगाव रोड, लातूर.

2)कृष्णा सुनील मुद्दे,राहणार बाबा नगर, दगडी कमान, खाडगाव रोड, लातूर.व सोबत त्याची आई अशा तिघांना आज सकाळी धाराशिव शहरातील वडार गल्ली, शिवाजी चौकातून गुन्ह्यात वापरलेल्या ईरटीका कारसह ताब्यात घेण्यात आले असून नमूद अशा तिघा आरोपीनीं मिळून मागील काळातील घरगुती भांडणाच्या कारणावरून शिवाजी देवकर याचा लोखंडी कत्तीने मानेवर छातीवर मारून खून केल्याचे कबूल केले.

त्यावरून नमूद आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास कामी पोलीस ठाणे शिवाजीनगर यांची ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार युवराज गिरी, राहुल सोनकांबळे, अर्जुन राजपूत, पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलिस अमलदार काकासाहेब बोचरे, महिला पोलीस अंमलदार साधना सूर्यवंशी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या