Ticker

6/recent/ticker-posts

तामलवाडी MIDC मध्ये गुंतवणूक करण्यास १३० उद्योजकांची बैठकीत तयारी


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तामलवाडी MIDC मध्ये गुंतवणूक करण्यास १३० उद्योजकांची बैठकीत तयारी

टेक्सटाईल साठी ८० तर गारमेंट साठी ५० जण गुंतवणूक करण्यास तयार:आ.राणाजगजीतसिंह पाटील यांची माहिती

तामलवाडी: तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे ३६७ एकरावर नवीन औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अनुषंगाने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लघु उद्योजकांची आज सोलापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीत एमआयडीसीचे लातूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपस्थित उद्योजकांपैकी टेक्सटाईलसाठी ८० तर गारमेंटसाठी ५० जणांनी गुंतवणूक करण्यास तयारी दर्शवली आहे.या प्रत्येक उद्योगाला ५०-१०० कामगारांची आवश्यकता असल्याची माहिती उपस्थित उद्योजकांनी दिली आहे ही बाब अत्यंत आनंदाची आहे.आपण १०००० रोजगार निर्मितीचे जे उद्दिष्ट ठेवलं आहे ते सहज साध्य होईल असा विश्वास वाटतो.यामुळे जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसह औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.असे तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या